फेसबुकचे डेटिंग फीचर लाँच!


ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती, ते फेसबुक डेटिंग फीचर लाँच करण्यात आले आहे. हे फीचर फेसबुकचा सीईओ मार्क झकेरबर्ग याने लाँच केले. डेटिंग फीचरचा पर्याय फेसबुकच्या अॅपमध्येच असणार आहे. त्यासाठी वेगळे प्रोफाईलही बनवता येणार आहे, तसेच तुमचे प्रेफरन्सेस सेट करता येणार आहेत.

फेसबुकवर २० कोटी लोक सिंगल आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासाठी बरच काही करता येईल, असे आम्हाला वाटत असल्याचे झकेरबर्ग म्हणाला. टिंडरसारखे डेटिंग अॅप सध्या उपलब्ध आहेत. जोडीदार शोधण्यासाठी किंवा डेटिंगसाठी या अॅप्सना मिळणारा प्रतिसाद तुफान असल्यामुळेच फेसबुकने डेटिंग सेवेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment