समुद्रातील ह्या गुहेचे रहस्य अखेर उघड


जमिनीच्या खाली असणाऱ्या किंवा घनदाट अरण्यामध्ये दडलेल्या गुहांचा अचानक शोध लागल्याच्या घटना आपण अनेकदा वाचतो, ऐकतो. पण ही गुहा आहे समुद्रामध्ये. ह्या गुहेशी निगडीत अशी काही रोचक तथ्ये देखील आहेत. स्कॉटलंड देशाच्या पश्चिमी तटावर स्टाफा च्या रॉक आयलंडवर असणारी ही फिंगल गुहा आहे. ही गुहा बाहेरून देखील अतिशय सुंदर, आकर्षक आहे, त्याचप्रमाणे आतूनही ही गुहा अतिशय सुंदर दिसते.

ही गुहा ज्या खडकांनी बनलेली आहे, ते सर्व खडक अगदी सरळसोट आहेत. ह्या खडकांची निर्मिती समुद्रातील लाव्हाचा पदार्थ थंड झाल्यावर झालेली आहे. ह्या खडकांची रचना इतकी विशिष्ट प्रकारची आहे, की त्या विशिष्ट रचनेमुळे ही गुहा तयार झाली आहे. फिंगलच्या ह्या गुहेला स्कॉटलंडमध्ये ‘उअम बिन’ असे म्हटले जाते. ह्या शब्दांचा अर्थ आहे ‘लय असलेली किंवा नाद असलेली गुहा’.

ह्या गुहेला असे नाव दिले जाण्यामागचे कारण हे, की येथील खडकांवर समुद्राच्या लाटा आदळल्यानंतर त्यातून एक सुंदर लय किंवा नाद ऐकू येत असतो. ह्या गुहेच्या आसपास चे निसर्गसौंदर्य देखील दृष्ट लागण्याइतके मोहक आहे. स्कॉटलंडला भेट देणारे पर्यटक ही गुहा पाहण्यासाठी आवर्जून येत असतात.

Leave a Comment