चांदीच्या किमतीत विकला जातोय व्हॅनिला


व्हॅनिलाचा सुगंध दरवळला की सर्वप्रथम आठवण येते आईसक्रीमची. व्हॅनिला फ्लेव्हरचे आईसक्रीम, केक हि अनेकांची प्रथम पसंती आहे. गेली काही वर्षे व्हॅनिलाचे दर वाढत चालले असून यंदा त्यांनी उच्चांक गाठला आहे. ब्रिटनचा बाजारात व्हॅनिलाचा दर किलोला ६०० डॉलर्स म्हणजे ४० हजार भारतीय रुपयांवर पोहोचला असून या किमतीत १ किलो चांदी सहज खरेदी करता येते आहे. ब्रिटन मध्ये चांदीचा दर किलोला ३५५०० रुपये आहे.

व्हॅनिलाचे उत्पादन मोजक्या देशात होते. त्यात मादागास्कर येथे सर्वाधिक उत्पादन होते व त्याखालोखाल पापुआं, न्यू गिनी, भारत, युगांडा येथे होते. यंदा चक्रीवादळामुळे मादागास्कर मध्ये पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र जगभरात व्हॅनिलाची मागणी वाढली आहे. व्हॅनिलाची शेती करणे सोपे नाही त्यातही बियातून अर्क काढणे अति कौशल्याचे असते. यामुळे केशरानंतर व्हॅनिला हे दुसरे महाग पिक मानले जाते. अमेरिकन आईसक्रीम कंपन्यांकडून त्याला चांगली मागणी आहे मात्र दरामुळे अनेक आईसक्रीम कंपन्या अडचणीत आल्या आहेत. व्हॅनिलाचा उपयोग आईसक्रीम शिवाय मिठाई, परफ्युमपर्यंत अनेक ठिकाणी केला जातो.

Leave a Comment