लाँच होण्यापूर्वीच बिगबीच्या हातात दिसला वनप्लस ६


चीनी कंपनीच्या बहुप्रतीक्षित स्मार्टफोन वनप्लस ६ चे ग्लोबल लाँचिंग लंडन येथे १७ मे आणि मुंबईत १८ मे रोजी होणार असल्याची घोषणा झाली असताना लाँचिंग पूर्वीच हा फोन बॉलीवूड सेलेब्रिटी बिगबी याच्या हातात दिसला आहे. स्वतः बिगबी यांनी त्याचे फोटो ट्विटरवर टाकले होते मात्र नंतर ते काढून टाकले गेले.

या फोटोत बिगबी आणि कंपनीचे सीईओ पीट लाऊ यांच्या हातात वनप्लस सिक्स स्मार्टफोन स्पष्ट दिसले आहेत, बिग बी च्या हातात काळ्या रंगाचा तर पिट यांच्या हातात पांढरया रंगाचा फोन आहे. त्यात रिअर साईडला मधोमध व्हर्टीकल डूअल कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह दिसत आहे आणि त्याखाली फिंगरप्रिंट सेन्सर दिसतो आहे. या दोन्ही फोन मध्ये ग्लास बॅक पॅनल आहे याचा अर्थ हा फोन वायरलेस चार्जिंग सुविधेसह असेल. हा फोन मध्ये जाड तर कडेने पातळ दिसतो आहे.

आत्तापर्यंत रिलीज झालेल्या टीझर नुसार त्याला ६ इंची फुल एचडी डिस्प्ले, २० आणि १६ एमपीचे रिअर तर १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा असेल. तो ६ जीबी व ८ जीबी रॅम सह आणि ६४ व १२८ जीबी स्टोरेज सह असेल. हा फोन विक्रीसाठी अॅमेझोन वरचा उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment