या मुलीने प्रवेश घ्यावा म्हणून कॉलेजांनी लावल्या रांगा


शाळा कॉलेजचे प्रवेश म्हणजे विद्यार्थी वर्गाच्या लांब लांब रांगा, चांगले कॉलेज मिळावे म्हणून होणारी धावपळ हे नेहमीचे दृश्य असले तरी अमेरिकेतील एका १७ वर्षीय मुलीचा अनुभव मात्र फारच वेगळा आहे. तिला कोणत्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावा असा संभ्रम पडला आहे कारण ११३ कॉलेजांनी तिने आपल्या कॉलेज मध्ये यावे म्हणून तिला ऑफर पत्रे पाठविली आहेत आणि काही कॉलेजांनी ३० कोटी रुपयांची स्कॉलरशिप देण्याची तयारीही दाखविली आहे.

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील जस्मिन हॅरीसन या मुलीने शाळेचे शिक्षण उत्तम मेरीटने पूर्ण केले आणि तिची पात्रता पाहून ११३ कॉलेजनी तिला त्यांच्याकडे प्रवेश घ्यावा म्हणून गळ घातली. न्यूयॉर्क टाईम्स च्या बातमीनुसार जस्मिन ला ३० कोटीची स्कॉलरशिप देण्याची तयारीही दाखविली गेली आहे. युएस मधील टॉप १० महाविद्यालयेही जस्मिनने त्यांच्याकडे शिकावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

जस्मिनला नर्स बनायचे आहे आणि तिने अनेक कॉलेजात बायोलॉजी मधील पदवीसाठी अर्ज केला होता. तिला मिळालेल्या या प्रतिसादाने परीक्षेत ती जितकी गोंधळली नाही तितकी आता गोंधळली आहे असे समजते.

Leave a Comment