शाओमी रेडमी एस २ चे पोस्टर लिक


चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने त्याच्या रेडमी सिरीजमधल्या बजेट स्मार्टफोन रेडमी एस २ चे लाँचिंग १० मे रोजी होत असल्याचे जाहीर करण्यापूर्वीच या फोन फोटो लिक झाले आहेत. या फोनची ग्राहक प्रतीक्षा करत आहेत त्यामुळे त्याच्या फीचर्स बद्दलही उत्सुकता आहे.

लिक झालेल्या फोटोत या फोनच्या वरच्या भागात आयफोन एक्स प्रमाणे अँटीन लाईन्स व व्हर्टिकल डूअल कॅमेरा दिसत आहे. माय ड्रायव्हर्सच्या रिपोर्टनुसार या फोनच्या गोल्ड कलर व्हेरीयंटवरील फिचर मध्ये आर्टिफीशीअल इंटेलीजंस सह १२ एमपीचा रिअर प्रायमरी कॅमेरा आणि ५ एमपीचा सेकण्डरी कॅमेरा दिसत आहे. या फोनची विक्री चीनी सुनिंग डॉट कॉम वरून केली जाणार असून त्याची किंमत १ हजार युआन म्हणजे साधारण १०,६०० रु. असेल असे समजते.

फोनला ५.९९ इंची एचडी स्क्रीन दिला जाईल तसेच हा फोन २, ३ आणि ४ जीबी रॅम मध्ये १६, ३२, ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज सह असेल असेही समजते. फोनला १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा आणि ३ हजार एमएएच ची बॅटरी दिली जाईल.

Leave a Comment