पिरामल वॉटर एटीएम बसवा आणि महिना २० हजार कमवा


उद्योजक मुकेश अंबानी याची कन्या ईशा ज्या पिरामल घराण्यात सून बनून जात आहे त्या कंपनीबरोबर व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली असून इच्छुक त्याचा फायदा घेऊ शकणार आहेत. पिरामल सर्वजल या नावाने हि कंपनी वॉटर एटीएमसाठी फ्रांचाईजी देत असून त्यातून महिना १५ ते २० हजाराची कमाई करता येणार आहे. उन्हाळ्यात आणि वर्षभरहि शुद्ध पाण्याला मागणी असते हे लक्षात घेऊन रेल्वे, मेट्रो, शाळा, ऑफिस, पर्यटन स्थळे, रुगानालये, सार्वजनिक बागा, पेट्रोल पंप, मार्केट, रोडसाइड रेस्टोरंट अश्या अनेक जागी देशभरात अशी वॉटर एटीएम बसविण्यासाठी कंपनी फ्रांचाईजी देत आहे.

पिरामल सर्वजल हा पिरामल फाउंडेशनचा हिस्सा आहे. या एटीएम मध्ये इनबिल्ट आरओ सिस्टीम असते. अशी एटीएम १६ राज्यात बसविली जाणार आहेत.यात ग्राहक नाणी अथवा नोटा टाकून छोट्या ग्लास पासून ते २० लिटर जार पर्यत शुद्ध पाणी विकत घेऊ शकणार आहेत. कंपनीतर्फे एटीएम इन्स्टॉलेशनसाठी मदत दिली जाणार आहे त्याचबरोबर पहिल्या वर्षी काम्पोनंट रिप्लेसमेंट गॅरंटी दिली जाणार आहे. दरमहा मेंटेनन्स सर्व्हिस मिळेल असेही समजते. सध्या अशी ३३० मशीन बसविली गेली आहेत. ज्यांना मशीन बसवायची आहेत यांना त्याची सर्व माहिती सर्वजल डॉट कॉम या साईटवर मिळू शकणार आहे.

Leave a Comment