‘बिटकॉइन’बाबत वॉरन बफे यांची भविष्यवाणी


नवी दिल्ली : गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सीपासून दूर राहण्याचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञ वॉरन बफे यांनी दिला असून वॉरन बफे यांनी गुंतवणूकदारांना नुकत्याच झालेल्या बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत हा मोलाचा सल्ला दिला. गुंतवणूकदाराने वार्षिक बैठकीत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, बिटकॉइन किंवा त्यासारख्या इतर कोणत्याही प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये मी गुंतवणूक केलेली नाही. शिवाय लवकरच अशा प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य कमी होण्याची शक्यता देखील यांनी व्यक्त केली.

बिटकॉइन किंवा त्यासारख्या इतर क्रिप्टोकरन्सी या अन-उत्पादक मालमत्ता असून त्यांच्यात फक्त दुर्मिळतेव्यतिरिक्त इतर दुसरा कुठलाही इतर उत्पादक गुणधर्म नसल्यामुळे नजीकच्या काळात क्रिप्टोकरन्सीला ‘बुरे दिन’ येणार आहेत. याबाबत बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष चार्ली मुंगर म्हणाले की, क्रिप्टोकरन्सी म्हणजे ‘फक्त मनोभ्रंश’ असल्यामुळे त्यात गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांच्या हिताचे नाही.

Leave a Comment