शनी जयंतीच्या निमित्ताने…


ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी शनी जयंती पंधरा मे रोजी, मंगळवारी आली आहे. ह्या दिवशी शनी देवांची पूजा केल्याने शनी महाराजांची विशेष कृपा प्राप्त होते. म्हणूनच ह्या दिवशी शनी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी, पूजा करण्यासाठी देशभरातील शनी देवस्थानांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असते. ह्या दिवशी शनी देवांची पूजा करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

शनीदेवांची पूजा करण्याचे आधी त्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करावे. शनी देवांच्या बरोबर जे भाविक दर शनिवारी हनुमानाची आराधना करतात, त्यांच्यावर शानिदेवांची विशेष कृपादृष्टी असते. शनिदेव आणि सूर्यामध्ये वितुष्ट असल्याचे मानले जात असल्याने शनी जयंतीच्या दिवशी शक्यतो सूर्याची पूजा करू नये. शनिदेवांचे दर्शन घेताना आधी त्यांच्या चरणांचे दर्शन घ्यावे. शनिवारी आणि विशेषतः शनी जयंतीच्या दिवशी गोरगरीबांसाठी दानधर्म करणे विशेष पुण्य देणारे म्हटले जाते. तसेच ह्या दिवशी लांबचा प्रवास प्रवास शक्यतो टाळावा. प्रवास करणे अगदी अनिवार्य असेल, तरच प्रवास करावा.

शनी जयंतीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच काळे तीळ, काजळ, किंवा इतर कुठल्याही काळ्या रंगाच्या वस्तूचे दान करावे. शनी अमावास्येच्या आणि शनी पूजनाच्या वेळी काळ्या गायीला तेलात बनविलेला पदार्थ खाऊ घालणे पुण्यकारक मानले जाते. ह्या दिवशी लोखंडाच्या वस्तूची खरेदी करू नये. तसेच ह्या दिवशी शनीदेव मंदिरामध्ये जाऊन शनीदेवांना आणि पिंपळाच्या झाडाला तेल अर्पण करावे.

Leave a Comment