बोहल्यावर चढतेय ईशा अंबानी


उद्योजक मुकेश अंबानी यांची लाडकी कन्या आणि आकाश अंबानी यांची जुळी बहिण ईशा डिसेंबर मध्ये बोहल्यावर चढणार असल्याचे वृत्त आहे. पिरामल एन्टरप्रायझेसचे अजय याचा मुलगा आनंद याने ईशाला महाबळेश्वर येथील मंदिरात प्रपोज केले आणि दीर्घकाळाचा मित्र आनंदचे हे प्रपोजल ईशाने त्वरित स्वीकारले असे समजते. पिरामल आणि अंबानी या दोन्ही कुटुंबांचा दीर्घकाळ स्नेह आहे तो ईशा आनंदच्या लग्नाने नात्यात बदलणार आहे. इशा आनंद लग्न करणार या आनंदात दोन्ही कुटुंबांनी एकत्र जेवण घेतले त्याला कोकिलाबेन उपस्थित होत्या.

आनंद यांनी हार्वर्ड बिझिनेस स्कूल मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते सध्या पिरामल एन्टरप्रायझेस चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. पेन्सिल्व्हीनिया विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी पिरामल स्वास्थ या ग्रामीण लोकांसाठी आरोग्य सेवा देणाऱ्या स्टार्टअपची सुरवात केली होती. आज या ठिकाणी दररोज ४० हजार रुग्णांवर उपचार केले जातात. त्यांनी पिरामल रियालटी या नावाने दुसरे स्टार्टअप याचवेळी सुरु केले होते. इंडिअन मर्चंट चेम्बर युथविंग चे ते सर्वात तरुण अध्यक्ष होते.

Leave a Comment