फेसबुक उतरतेय ई कॉमर्स व्यवसायात


मेसेंजर आणि ई पेमेंट या दोन नव्या सुविधा युजर्सच्या अंगवळणी पडल्यानंतर जगप्रसिद्ध सोशल नेटवर्क साईट फेसबुक आता ई कॉमर्स व्यवसायात प्रवेश करत आहे. फेसबुकची ही स्वतःची साईट पुढच्या महिन्यात म्हणजे जून मध्ये सुरु होत असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली असून त्यामुळे बाजारात अगोदरच या क्षेत्रात असलेल्या अन्य ई कॉमर्स कंपन्यांसमोर फेसबुकचे आव्हान पेलण्याचे संकट उभे राहिले आहे.

सध्या या क्षेत्रात अमेझॉन, फ्लिपकार्ट, ईबे, मिन्त्रा अश्या कंपन्याचा दबदबा आहे आणि युजरसाठी ही ठिकाणे नेहमीची खरेदी ठिकाणे बनली आहेत. फेसबुक या कंपन्यांना कशी टक्कर देणार याची उत्सुकता आहेच पण जाणकारांच्या मते फेसबुक आक्रमक एन्ट्री करेल कारण आत्ताच सोशल मिडीयावर फेसबुकची ही कल्पना युजरना प्रचंड आवडली असल्याचे संकेत मिळत आहेत. फेसबुक त्याच्या ई कॉमर्स साईटचे सध्या टेस्टिंग करत असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment