आगामी दशकात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत आघाडीवर


येत्या दशकात जगातील सर्वात जलद विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत आघाडीवर असेल, असे हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी तयार केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. भारताची अर्थव्यवस्था दरवर्षी 7.9 टक्क्यांनी वाढणार असून हा दर चीन आणि अमेरिकेच्याही पुढे आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

“भारत आणि व्हिएतनामसारख्या ज्या देशांनी आपल्या अर्थव्यवस्थांना अधिक जटिल क्षेत्रांत विभाजित केले आहे त्या पुढील दशकभरातील काळात सर्वात जलद वाढतील. भारताने रसायने, वाहने आणि काही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांचा समावेश करून आपली निर्यात वाढविण्यात प्रगती साधली आहे,” असे हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील सेंटर फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने (सीआयडी) म्हटले आहे.

आर्थिक प्रगतीच्या या अंदाजानुसार, आगामी दशकात 2026 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 7.9 टक्के दराने वाढेल. चीनमध्ये हाच दर दरवर्षी 4.9 टक्के, अमेरिकेत 3 टक्के आणि फ्रान्समध्ये 3.5 टक्के असेल, असे या अहवालात म्हटले आहे. भारताखालोखाल सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत युगांडा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याची वाढ 7.5 टक्के दराने होणे अपेक्षित आहे.

Leave a Comment