सहारा समूहाच्या प्लाझा हॉटेलची ४ हजार कोटीला विक्री


सहारा समूहाच्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील प्लाझा हॉटेलची विक्री ६० कोटी डॉलर्स म्हणजे ४ हजार कोटी रुपयांना होत असून हा व्यवहार जूनमध्ये केला जाणार आहे असे समजते. १९०७ साली बांधले गेलेल्या या ऐतिहासिक हॉटेलची मालकी काही काळापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीकडे होती आणि सध्या सहारा समूह या हॉटेलमध्ये ७० टक्के भागीदार आहेत.

हे हॉटेल दुबईतील व्हाईट सिटी व्हेन्चरचे संस्थापक शाहल खान आणि हकीम ऑर्गनायझेशनचे कामरान हकीम दोघे मिळून घेणार आहेत. सहारा समूहाचे कार्पोरेट वित्तप्रमुख संदीप वाधवा यांनी २५ जून रोजी हा सौदा होणार असल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली मात्र सविस्तर माहिती दिली नाही असे समजते. न्यूयॉर्क टाईम्स ने हि बातमी दिली आहे.

Leave a Comment