निसर्गरम्य टुमदार कसौली


उन्हाने तापून निघाल्यावर थंड हवेच्या ठिकाणी चार दिवस जावे असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र या दिवसात तेथेही गर्दी होते. हिमाचल मधील कसौली हे पर्यटन स्थळ सुटीसाठी आदर्श ठरू शकते कारण सर्व प्रकारच्या पर्यटकांसाठी येथे काही ना काही आहेच. चंडीगड आणि सिमला याच्या मधोमध असलेले हे निसर्गरम्य ठिकाण अगदी टुमदार आहे. येथील निसर्ग पर्यटकांना मंत्रमुग्ध करेल. चीड, देवदारच्या उंच उंच वृक्षांनी झाकलेले उंच पहाड डोळ्यांना शांतता देतील. इतकेच नव्हे तर येथील रस्तेहि अगदी रोमँटिक आहेत याचा अनुभव प्रत्यक्षात घ्यायला हवा.

येथे साहसाची आवड असलेल्यांना ट्रेकिंगची संधी आहे, निसर्गप्रेमींसाठी नेचर वॉक आहे, खरेदीची आवड असलेल्यांसाठी शॉपिंगची मस्त सोय आहे आणि खादाडीची आवड असलेल्यांसाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ जागोजागी उपलब्ध आहेत. येथे भेट देणारयाचे तन, मन रिफ्रेश होणारच याची खात्री हे चिमुकले हिल स्टेशन देते.


येथील सर्वाधिक उंच मंकी पॉइंट वरून संपूर्ण शहराचा देखावा पाहता येतो. येथे एक प्राचीन हनुमान मंदिर आहे. सनसेट पॉइंट अतिशय शांत जागा असून येथे फक्त पक्ष्यांचा आवाज आणि वाहणाऱ्या वारयाचा आवाज येतो. शीख धर्मियांचे पवित्र गुरुद्वारा जगभरातून आलेल्या भाविकांनी गजबजलेले असेत. एन्जालीकन चर्च शांतीची अनुभूती देते तर मॉल रोड हे सर्वच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथला रंगबिरंगी बाजार, छोटे छोटे फूड जॉइंट सर्वांसाठी हवे ते पुरविण्यास सज्ज असतात. येथे जाण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा सिझन सर्वोत्तम आहे.

Leave a Comment