ट्विटरची ३३ कोटी युजर्सला पासवर्ड बदलण्याची विनंती


नवी दिल्ली – आपल्या युजर्सना पासवर्ड बदलण्याचे ट्विटरने आवाहन केले असून त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रकही ट्विटरकडून जारी करण्यात आले आहे. ट्विटरने ३३ कोटी युजर्सला स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे.

पासवर्ड बदलण्याच्या केलेल्या आवाहनसोबत इंटरनल लॉगमध्ये बग आढळलेल्या बगवर उपाय योजला असल्याचेही ट्विटरने सांगितले आहे. एकाही ट्विटर अकाऊंटचा आतापर्यंत गैरवापर झाल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून वापरकर्त्यांनी स्टोअर्ड पासवर्ड त्वरित बदलावा, असे आवाहन ट्विटरकडून करण्यात आले आहे.

तुम्ही संगणक, मोबाइल, लॅपटॉप किंवा कोणत्याही गॅजेटवर ट्विटर अकाऊंट वापरत असाल तर तुमचा पासवर्ड तुम्ही त्वरित बदलावा असे ट्विटरने म्हटले आहे. या स्वरूपाचा बग पुन्हा येऊ नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेत आहोत असेही ट्विटरने आपल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment