व्हॉट्सअॅपचा सीईओ होणार भारतीय तरुण ?


भारतीय तरुणाचे नाव व्हॉट्सअॅप या अग्रगण्य मेसेजिंग अॅपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी आघाडीवर असून व्हॉट्स अॅपच्या सीईओपदावर मूळचे भारतीय असलेले नीरज अरोरा यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. गेल्या सात वर्षांपासून नीरज अरोरा हे व्हॉट्स अॅपमध्ये कार्यरत आहेत.

चार दिवसांपूर्वीच व्हॉट्स अॅपचे सहसंस्थापक जेन कॉम यांनी कंपनीला रामराम ठोकला होता. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून आता व्हॉट्सअॅपच्या सीईओपदी कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नीरज अरोरा यांचे नाव या स्पर्धेत आघाडीवर आहे. गेल्या सात वर्षांपासून मूळचे भारतीय असलेले नीरज अरोरा हे व्हॉट्सअॅपमध्ये कार्यरत आहेत. ते सध्या व्हॉट्सअॅपमध्ये बिझनेस एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत. यासंदर्भात टेकक्रंच या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार ते सध्या व्हॉट्सअॅपमध्ये चौथ्या क्रमांकावर असून ते व्हॉट्स अॅपमधील ‘ऑल थिंग्स बिझनेस’ या विभागाचे प्रमुख आहेत.

दिल्ली आयआयटीचे नीरज अरोरा हे माजी विद्यार्थी आहेत. पदवी घेतल्यानंतर २००६ साली त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए इन फायनान्स अँड स्ट्रॅटेजी केले. दिल्ली आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर ते २००० साली अॅसिलिओन या कंपनीत नोकरीला लागले. यानंतर त्यांनी टाइम्स इंटरनेट लिमिटेडमध्येही काम केले. जवळपास १८ महिने ते तिथे कार्यरत होते. याशिवाय ते पेटीमच्या संचालक मंडळातही होते. यानंतर विविध कंपन्यांमध्ये काम केल्यावर २००७ मध्ये ते गुगलमध्ये गेले. डिसेंबर २००७ ते नोव्हेंबर २०११ या कालावधीत ते गुगलमध्ये कार्यरत होते. गुगलमध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंट मॅनेजर यापदावरुन ते प्रिन्सिपल कॉर्पोरेट डेव्हलपमेंट या पदावर पोहोचले. गुगलनंतर ते व्हॉट्स अॅपमध्ये रूजू झाले.

Leave a Comment