यंदा पूर्ण स्वरुपात अवतरले बर्फानी बाबा


हिमालयातील पवित्र अमरनाथ उर्फ बर्फानी बाबा यात्रा अधिकृतपणे २८ जूनपासून सुरु होणार असली तरी पंजाबातील काही लोकांनी २८ एप्रिल रोजीच अमरनाथ गुहेत प्रवेश करून बर्फानी बाबांचे दर्शन घेतले आहे. या लोकांनी तेथील व्हिडीओ प्रसारित केला असून अमरनाथचे पूर्ण १२ फुटी बर्फलिंग तयार झाले असल्याचे तसेच शेजारी पार्वती आणि गणेश याच्याही बर्फाच्या पिंडी तयार झाल्या असल्याचे संबंधही अधिकाऱ्यांशी संपर्क करून सांगितले आहे.

दरवर्षी अमरनाथ यात्रा पेहेलगाम आणि बलताल अश्या दोन मार्गाने जाते. हे दोन्ही मार्ग अद्यापि बर्फाने झाकलेले आहेत. त्यामुळे पायी या मार्गावर जाणे सध्या अवघडच नाही तर धोकादायक आहे. या यात्रेला पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय जाता येत नाही तरीही पंजाबातील काही जणांनी पेहलगममार्गे जाऊन गुहेत अमरनाथ दर्शन घेतले आहे त्यासाठी त्यांनी दोन दिवस पायी प्रवास केला असे समजते.

Leave a Comment