येत्या काही दिवसात इंस्टाग्राममध्ये दिसून येतील अनेक बदल


फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यांसारख्या सोशल साईट्सवर सध्याच्या घडीला कोणाचे अकाऊंट नाही, असे खूपच कमी लोक तुम्हाला सापडतील. वारंवार या सोशल साईट्स अपडेट होत असतात. त्यासोबत आपल्यालाही अपडेट व्हायचे असेल तर त्यातील बारकावे, नव्या येणारे अपडेट्स जाणून घेणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसात आता फेसबुकच्या अधिपत्यात असलेल्या इंस्टाग्राममध्ये अनेक बदल दिसून येतील. इंस्टाग्रामवर सध्या फोटोज, व्हिडिओज आणि GIF चे कलेक्शन दिसून येते. पण याची व्यवस्था काहीशी अव्यस्थ आहे. त्याचबरोबर तुमच्या वापरावर ते अवलंबून आहे.

कोणताही योग्य पॅटन या कलेक्शनला नाही. इंस्टाग्रामवर युजर्सच्या आवडीनिवडीचा विचार न करता सर्व काही कसेही दिसते. म्हणजे फोटग्रापी, ट्रव्हल, सेलिब्रेटीज अशा काही ठराविक कॅटेगरीज नाही. म्हणून आता इंस्टाग्राम अधिक क्लीन आणि ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फेसबुकने ब्लॉगवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, आता इंस्टामध्ये नाविण्यपूर्ण बदल करण्यात येणार असून कॅटगरीनुसार पोस्ट दिसतील. आता पोस्ट करताना तुम्ही त्या कॅटगरीची निवड करु शकता.

Leave a Comment