मुकेश अंबानी स्वत:च्या सुरक्षेवर करतात एवढा खर्च


आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची ओळख आहे. मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत असल्यामुळे त्यांना तशाच प्रकारची सुरक्षाही पुरवण्यात आली आहे. मुकेश अंबानीना कमांडोंपासून बाऊंन्सरपर्यंत सुरक्षा पुरवतात. मुकेश अंबानी आपल्या सुरक्षेसाठी महिन्याला २० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करतात. जेव्हा मुकेश अंबानी घरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी जवळपास दोन डझन सुरक्षा रक्षक तैनात असतात. सरकारकडून मुकेश अंबानींना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. भारतातील कोणत्याही व्यक्तीला मिळणारी ही तिसऱ्या क्रमांकाची सुरक्षा आहे.

त्याचप्रमाणे एका देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेपेक्षाही जास्त फेसबूकचा प्रमुख मार्क झुकेरबर्ग याच्या सुरक्षेचा खर्च आहे. झुकेरबर्गने २०१७साली सुरक्षेसाठी जवळपास ५ कोटी रुपये खर्च केले. २०१६सालाच्या तुलनेत हा खर्च ५० टक्के जास्त आहे. झुकेरबर्गने २०१६मध्ये ३.२ कोटी रुपये खर्च केले होते. सुरक्षेसाठी झुकेरबर्ग दिवसाला १.३० लाख रुपये खर्च करतो.

फोर्ब्सने दिलेल्या आकडेवारीनुसार ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनचे संस्थापक आणि मालक जेफ बेजोस हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असून सुरक्षेसाठी जेफ बेजोस एका वर्षाला १० कोटी रुपये म्हणजेच दिवसाला जवळपास २.८४ लाख रुपये खर्च करतात. आयफोन आणि आयपॅड बनवणारी कंपनी अॅपलचे सीईओ टीम कूक हे आपल्या सुरक्षेवर वर्षाला १,४५,६०,०० रुपये खर्च करतात. हा खर्च दिवसाला 40 हजार रुपये एवढा होतो. जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीचे सल्ले देणारा वॉरेन बफे त्यांच्या सुरक्षेवर वर्षाला २,५१,५५,०० रुपये खर्च करतात. हा खर्च दिवसाला जवळपास ६८ हजार रुपये एवढा होतो.

Leave a Comment