मागील ५ वर्षांत देशातील बँकांमध्ये १ लाख कोटींचे १३ हजार घोटाळे


नवी दिल्ली – देशातील बँकांत मागील पाच वर्षांत २३ हजार ८६६ घोटाळे उघडकीस आले असून १ लाख ७१८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार यात झाला. म्हणजेच दररोज गैरव्यवहाराची १४ प्रकरणे झाली, ज्यात बँकांना दररोज ७८ कोटींचा चुना लागला. आरटीआय अर्जावरील उत्तरात रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली. आरबीआयने म्हटले आहे की, या घोटाळ्यांतील दोषींवर कारवाई केली जात आहे. आयआयएम बंगळुरूच्या एका अहवालानुसार ५५% बँक घोटाळे सरकारी बँकांत झाले. मात्र रकमेच्या हिशेबात त्यांचा वाटा तब्बल ८३% आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत बँकांचे ८.४१ कोटी रुपयांचे कर्ज अडकलेले आहे.

Leave a Comment