फेसबुकवर नरेंद्र मोदींचाच बोलबाला


जिनिव्हा – जगातील इतर देशाच्या दिग्गज नेत्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेसबुकवर दुप्पट प्रसिद्ध असल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली असून मोदींना सोशल मीडियावर ४३.२ मिलियन लोक फॉलो करत आहेत. ट्रम्प यांच्या फॉलोअर्सपेक्षा दुप्पट ही संख्या आहे.

ट्विटरवर ट्रम्प यांचे २३.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. बर्सन कोहन अँड वुल्फ यांनी ‘वर्ल्ड लिडर्स ऑन फेसबुक’ या अंतर्गत एक अभ्यास केला असून त्यांनी तो अभ्यास आज प्रसिद्ध केला. ६५० स्टेटचे प्रमुख आणि विदेश मंत्रालयाच्या फेसबुक पेजेसच्या अॅक्टीव्हीटीचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच हा अभ्यास एकूण १२०१७ फेसबुकवरील डेटा एकत्र करुन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment