विमानात वायफाय वापरणार मग भरपूर पैसे देण्याची तयारी ठेवा


विमानप्रवासात वायफाय सुविधा मिळणार म्हणून विमान प्रवासी उल्हसित झाले असले तरी त्यासाठी मोजावे लागणारा दर ऐकल्यावर हा उल्हास थंडावण्याची शक्यता अधिक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. जगातील ज्या मोजक्या कंपन्या ही सेवा देत आहेत त्यासाठी त्या भरपूर चार्ज लावत आहेत. इन फ्लाईट वायफाय मोफत नाही. १० एमबीच्या इंटरनेट डेटा वापरासाठी किमान ३०२ रु.चार्ज आकाराला जातो असेही समजते.

भारतीय सीमेत हवाई प्रवासात ३ मिनिटे ते १ तास फ्लाईट प्रवासात इंटरनेट वापरल्यास ५०० ते १००० रु. प्रवाशांना भरावे लागतील असा अंदाज दिला गेला आहे. अर्थात हे दर लोकसभा निवडणुकांनंतर नक्की केले जातील असेही समजते. मात्र लिमिटेड डेटा ब्राउझिंग आणि इमेल वापर केल्यास दोन महिन्यांच्या मोबाईल बिल एवढा खर्च करावा लागेल. जगात सध्या ३ ते ४ कंपन्या हि सेवा देत आहेत. त्यात अमेरिकन कंपनी मोबाईल इंटरनेटसाठी ३३१ ते १३३६ रुपये तर लॅपटॉप इंटरनेट साठी ७३७ ते ३२८३ रु. इतका चार्ज लावते आहे. भारतात स्वस्त विमान प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. भारतात प्रथम ही सेवा स्पाईस जेट सुरु करेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment