बिटकॉईनला मागे टाकणारी इथेरम क्रीप्टोकरन्सी


बिटकॉईन या क्रीप्टो करन्सीची क्रेझ जगभर वाढली असतानाच इथर अथवा इथेरम नावाच्या दोन वर्षांपूर्वी लाँच झालेल्या क्रीप्टोकरन्सीने त्याला तगडी स्पर्धा निर्माण केली आहे. दोन वर्षापूर्वी १० डॉलर दर असलेली हि करन्सी जानेवारी २०१८ मध्ये पाहतापाहता १४०० डॉलर्सवर गेली असून अनेक गुंतवणूकदार आजही यात गुंतवणूक करत आहेत. एका १९ वर्षीय रशियन प्रोग्रामरने हि आभासी करन्सी मे २०१५ मध्ये लाँच केली होती.

आज जगातील अनेक देशांनी बिटकॉईन वर बंदी घातली आहे त्याचा परिणाम होऊन इथरचा दर ७०० डॉलर्स वर आला होता मात्र तरीही अन्य आभासी चलनाच्या तुलनेत गुंतवणूकदार तिला प्राधान्य देताना दिसत आहे. ब्लॉकचेन बोर्ड ऑफ डेरीव्हेटीव्हजचे संचालक हुबर्त यांच्या म्हणण्यानुसार बिटकॉईन जेव्हा २००९ साली रिलीज झाले तेव्हा जागतिक मंदी होती त्यामुळे ती जगातील मोठी डिजिटल करन्सी होती पण त्यानंतर आत्तापर्यंत १५०० आभासी करन्सी आल्या आहेत. इथरम त्यात महत्वाची ठरली आहे. हिचा वापर खूपच सोपा आहे आणि ती कुणीही चालवू शकतो. तिची फायदे अधिक आहेत. ती इमेल प्रमाणे ट्रान्स्फर करता येते. तिची सिस्टीम हॅकिंग प्रुफ आहे कारण तिची सिस्टीम कोड वर आधारित आहे आणि नकली कोड जनरेट करता येत नाही.

Leave a Comment