बाहेरच्या लोकांनाही मिळणार तुरुंगातील जेवण


पंजाब सरकारने तुरुंगात न जाताही ज्यांना तुरुंगातील जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी कॅन्टीन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार असे समजते की ज्योतिषी अनेकांना तोडगा म्हणून तुरुंगातील पोळी भाकरी खाण्याचा सल्ला देतात आणि यावर विश्वास असंणारे लोक या ना त्या प्रकारे तुरुंगातून भाकरी पोळी मिळविण्याचा प्रयत्न करतात.

त्यामुळे तुरुंगाबाहेरच अशी कॅन्टीन सुरु करावीत असे प्रस्ताव कारागृह मंत्री सुखाजिंदसिंग रंधावा याच्याकडे आले आहेत. त्यावर सरकार विचार करत आहे असे ते म्हणाले. यामुळे तुरुंगातील कैदींच्या भेटीला येणारे नातलग आणि अन्य मित्र याच्या खाण्यापिण्याची सोय होऊ शकणार आहे आणि ज्यांना तुरुंगातील रोटी खायची आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. या जेवणाचा दर प्रती थाळी २०० रु. असेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment