प्रत्यक्षात अवतरला कार ट्रान्सफॉरमर


हॉलीवूड चित्रपटातून पाहता पाहता कारचा रोबो होताना किंवा रोबोची कार होताना पहिले आहे. ट्रान्सफॉरमर ही आता केवळ कल्पना उरली नसून जपान मधील संशोधकांनी ती सत्यात उतरविली आहे. त्यांनी असा रोबो तयार केला आहे जो स्वतः चक्क स्पोर्ट्स कार मध्ये ट्रान्स्फर होतो. टोकियोत हा रोबो सादर केला असून जे डाईट हाफ असे त्याचे नामकरण केले गेले आहे.


हा १२ फुट लांबीचा रोबो १ मिनिटात स्पोर्ट्स कार मध्ये बदलतो आणि ताशी ६० किमी वेगाने धावू शकतो आणि पुन्हा रोबो झाला कि ताशी १०० मीटर वेगाने चालतो. ब्रेव रोबोटिक्सचे सीईओ केंजी इशिडा यांनी हा रोबो ट्रान्सफॉरमर तयार केला आहे. लहानपणापासून त्यांना हि आवड होती. हा रोबो २ सीटर सस्पोर्ट्स कार मध्ये ट्रान्स्फर होतो. सध्या त्याच्या चाचण्या कारखान्यात सुरु आहेत.

कारचा रोबो बनताना तिच्या सीट आणि हूड वर उचलले जाते आणि रोबोचे डोके दिसते. याचा प्रोटोटाईप २०१४ मध्ये बनविला गेला होता आणि डिजिटल कॉन्टेस्ट एक्स्पो मध्ये सादर केला गेला होता. त्यानंतर पूर्ण रुपात तो तयार होण्यासाठी ३ वर्षे लागली.

Leave a Comment