घरगुती सिलेंडर झाला स्वस्त


नवी दिल्ली- घरगुती सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला असून विना अनुदानित सिलेंडर आणि १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरमध्ये जास्त दिलासा देण्यात आला आहे. १ मे पासून विना अनुदानित सिलेंडर दिल्लीमध्ये ६५०.५० रुपये, कोलकातामध्ये ६७४ रुपये, मुंबईमध्ये ६२३ रुपये आणि चेन्नईमध्ये ६६३ रुपये झाला आहे.

२-२ रुपयांनी कोलकाता आणि मुंबईमध्ये किंमती कमी झाल्या आहेत. विना अनुदानित सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याने १ कोटीपेक्षा अधिक लोकांना फायदा होणार आहे. सरकारकडून गेल्या ५ महिन्यांपासून विना अनुदानित सिलेंडरचे भाव कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. ५ महिन्यामध्ये दिल्लीमध्ये विना अनुदानित सिलेंडर ९६.५० रुपये, कोलकातामध्ये ९२ रुपये, मुंबईमध्ये ९६ रुपये आणि चेन्नईमध्ये ९३ रुपयांनी स्वस्त झाला आहे. १९ किलोचा कमर्शियल सिलेंडर दिल्लीमध्ये ११६७.५० रुपये, कोलकातामध्ये १२१२ रुपये, मुंबईमध्ये १११९ रुपये आणि चेन्नईमध्ये १२५६ रुपये झाला आहे. दिल्लीमध्ये याचा भाव एप्रिलमध्ये ११७६ रुपये, कोलकातामध्ये १२२०.५० रुपये, मुंबईमध्ये ११२८ रुपये आणि चेन्नईमध्ये १२६४.५० रुपये होता.

Leave a Comment