बेकटू ज्वालामुखीचे किम जोंग उनशी असे आहे नाते


चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर असलेला जागृत ज्वालामुखी बेकटू आज टूरिस्ट स्पॉट म्हणून लोकप्रिय असला तरी या पर्वताचे उ.कोरियाचा नेता किम जोंग उन याच्याशी वेगळेच नाते आहे. कारण या पर्वतावरच किमचे आजोबा किम इल सुंग याचा जन्म झाला होता असा दावा केला जातो. त्यावेळी हा ज्वालामुखी पर्वत जपानी लोकांच्या ताब्यात होता आणि किम इल सुंग यांनी जपान्यांशी गोरिला युद्ध करून त्याच्या तावडीतून तो मुक्त केला होता असे समजते. उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता या पर्वताच्या नावावरून आलेल्या बेकटू वंशाचा असला पाहिजे असा आग्रह आहे आणि किम जोंग उन या वंशाचा आहे.

हा पर्वत दक्षिण आणि उत्तर दोन्ही कोरिया साठी पवित्र आध्यत्मिक महत्वाचा आहे. चीन मध्ये त्याला चंगबई नावाने ओळखले जाते. या पर्वतावरून चीन आणि कोरिया मध्येही वाद निर्माण झाला होता. मात्र १९६२ साली त्यावर तोडगा निघाला. समुद्रसपाटीपासून २७४४ मीटर उंचीवर असलेल्या ज्वालामुखीचे भौगोलिक महत्व मोठे आहे. याचा जागेतून कोरियन लोकांची उत्पती झाली असे म्हणतात. त्यामुळे या पर्वताला उत्तर कोरियाच्या कोट ऑफ आर्म्स आणि राष्ट्रगीताच्या पॅराग्राफ मध्ये स्थान दिले गेले असून हा पर्वत कोरियाची राष्ट्रीय ओळख बनला आहे.

किम जोंग उन आणि द.कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन याच्या नुकत्याच झालेल्या भेटीत मून यांनी या पर्वतावर जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि किम जोंग ने पर्वताला जाण्याचा रस्ता खराब झाला आहे आणि त्याबद्दल खेद वाटतो असे उत्तर देऊन वेळ मारून नेली आहे. त्याचा स्वतःचा या पर्वतावरच फोटो मात्र प्रसिद्ध करण्यात आला आहे.
————

Leave a Comment