ताजमहाल आणि शनिवारवाडाही दिले जाणार दत्तक


केंद्र सरकारने अॅडॉप्ट अ हेरीटेज या उपक्रमाअंतर्गत दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला दालमिया ग्रुपच्या पदरात २५ कोटीत दत्तक दिल्याच्या विरोधात चर्चेचे मोहोळ उठले असले तरी सरकार हा उपक्रम सुरूच ठेवणार आहे. त्यात देशातील प्रसिद्ध ताजमहाल आणि पुण्याचा ऐतिहासिक शनिवार वाडाही कार्पोरेट कंपन्यांना दत्तक दिला जाणार आहे. देशातील अश्या ९० ऐतिहासिक वास्तू सरकारने त्यासाठी निश्चित केल्या आहेत. २०१७ साली या उपक्रमची घोषणा राष्ट्रपतींनी जागतिक पर्यटनदिनी केली होती.

या उपक्रमाअंतर्गत देशातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू काही वर्षाच्या मुदतीने देखभाल, दुरुस्ती, पर्यटन विकास यासाठी काही रक्कम घेऊन दिल्या जाणार आहेत. अशी पहिली २२ वास्तूंची यादी तयार केली गेली असून त्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि तेलंगाना राज्याच्या समावेश आहे. यात महाराष्ट्रातील शनिवार वाडा बरोबर कार्लेभाजे लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला याचा समावेश असल्याचे समजते.

Leave a Comment