टोक्योत भरतो जगातला सर्वात मोठा मच्छीबाजार


इवल्याश्या जपानची राजधानी टोक्यो येथे जगातील सर्वात मोठा मच्छीबाजार भरतो. हे सुकोजी फिश मार्केट जगात प्रसिद्ध असून अनेक देशी विदेशी पर्यटक येथे आवर्जून भेट देतात. ८० वर्षे जुना असलेला हा बाजार आता अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पर्यावरणाला नुकसान पोहोचू नये यासाठी येथील रस्ता रुंदीकरण मोहीम पार पडू शकलेली नाही तसेच जमिनीची कमतरता यामुळे हा बाजार अन्यत्र हलविला जाणार असल्याचे सांगितले जाते.

या बाजाराचे मुख्य दोन भाग आहेत. आतील बाजार हा पूर्णपणे ठोक बाजार असून येथे किरकोळ ग्राहकांना प्रवेश नाही. त्याच्या बाहेर असलेल्या भागात किरकोळ बाजार, रेस्टोरंटस, सप्लाय स्टोर्स आहेत. ठोक बाजारात दरवषी जगातल्या सर्वात महागड्या माशाचा लिलाव केला जातो. होलसेल बाजारात ९०० परवानाधारक डीलर असून येथे स्टॉलवर माशांचे लिलाव होतात.

या बाजारात ४०० प्रकारचे सीफूड मिळते त्यात स्वस्त शेवाळ पासून महागड्या गाभोळी (माशाची अंडी)चा समावेश असतो. या बाजारात ६५ हजार अधिकृत कामगार काम करतात आणि येथे दरवर्षी ७ लाख मे.टन मासळी विकली जाते.

Leave a Comment