चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी ६ विशेष गाड्या


मुंबई – कोकणात उन्हाळी सुट्टीनिमित्त जाणाऱ्यांची संख्या पाहता या मार्गावर विशेष ६ गाड्या चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते करमाळी दरम्यान २ फेऱ्या, पनवेल ते करमाळी दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ४ फेऱ्या अशा एकूण ६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

१ आणि २ मेच्या मध्यरात्री दीड वाजता सीएसएमटी ते करमाळीदरम्यान गाडी सुटेल आणि सकाळी साडेअकरा वाजता गाडी करमाळीला पोहोचेल. ही गाडी करमाळी येथून ४ मेला सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि रात्री ११.१५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. तर पनवेल ते करमाळी ही गाडी पनवेल येथून २ मे आणि ३ मेला मध्यरात्री ११.४० ला सुटेल आणि करमाळीला सकाळी ९ वाजता पोहोचेल. करमाळी येथून २ मे आणि ३ मेला दुपारी २ वाजता गाडी सुटेल आणि पनवेलला रात्री १०.४० ला पोहोचेल. या सर्व गाड्यांचे आरक्षण १ मेपासून उपलब्ध होईल.

Leave a Comment