‘नासा’ने घेतली ठाण्यातील अक्षत मोहितेच्या प्रकल्पाची दखल


ठाणे : महाराष्ट्राचा एक मुलगा अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संस्थेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याचे नाव अक्षत मोहिते असे असून त्याच्या स्पेस सेटलमेंट म्हणजेच अंतराळात राहण्याच्या प्रकल्पाची नोंद नॅशनल स्पेस सोसायटीने घेतली आहे. आपल्या प्रकल्पाला त्याने सॅक्झीमो हे नाव दिले आहे.

अक्षतने हा प्रकल्प केवळ १० दिवसात बनवला आहे. यासाठी जगभरातून मुलांची निवड करण्यात आली आहे. तर भारतातून केवळ ४ मुलांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्याने हा प्रकल्प नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांच्या एका सेमिनारमधून प्रेरित होऊन केवळ १० दिवसात बनवला आहे. २४ ते २७ मे रोजी अमेरिकेच्या लॉस एंजल्स होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषदेतील पोस्टर सेशनमध्ये त्याने बनवलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे. त्याला त्यासाठी नासाकडून बोलावणे आले आहे. जगभरातून याठिकाणी स्पर्धक येणार असून, भारतातून केवळ ४ मुलांची निवड करण्यात आली आहे, ज्यात अक्षत हा एकमेव मराठी मुलगा आहे.

स्पेसरुपी शहरामध्ये रहिवाशी आणि औद्योगिक क्षेत्र असून यासाठी लागणारी वीज सौर उर्जा आणि मायक्रोव्हेवद्वारे निर्माण केली जाणार आहे. इंधनासाठी दोन इलेक्ट्रोन यांच्या संयोगातून इंधन निर्मिती केली जाणार आहे. हे स्पेस अंतराळात नेण्यासाठीही हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयुगावरील हायड्राजीन या इंधनाचा वापर केला जाणार आहे. तर इंटरनेटसाठी वायफायऐवजी लाईट इंटरनेट म्हणजेच लायफाय हे तंत्र स्पेसमध्ये वापरले जाणार आहे.

Leave a Comment