अॅपल आयफोन ८, ८+ रेड भारतात लाँच


अॅपल ने आयफोन ८ व ८+ ची विशेष एडिशन भारतात लाँच केली असून शुक्रवारपासून ती फ्लिपकार्टवर उपलब्ध झाली आहे. कंपनीने आफ्रिकेत एचआयव्ही आणि एडस या आजाराविरूढ लढण्यासाठी काम करणाऱ्या रेड प्रॉडक्टच्या भागीदारीत हे फोन बाजारात आणले असून ते लाल रंगात आहेत. हे फोन जागतिक पातळीवर यापूर्वीच लाँच झाले आहेत. त्यांच्या फिचर मध्ये कोणताही बदल केला गेलेला नाही.

आयफोन ८ ६४ जीबी आणि १२८ जीबी अश्या दोन व्हर्जन मध्ये आहेत. त्याच्या किमती अनुक्रमे ६७९४० व ८१५०० रुपये आहेत. आयफोन ८ प्लस ६४ आणि २५६ जीबी अश्या दोन व्हर्जन मध्ये आहेत. त्यांच्या किमती अनुक्रमे ७७५६० आणि ९१११० रुपये आहेत. २००६ साली प्रोडक्ट रेड ने आफ्रिकी देश घाना, केन्या, रवांडा, द,आफ्रिका, टांझानिया, झाम्बिया या देशात एडस विरोधात काम सुरु केले आहे.

फ्लिपकार्टवर एक्स्चेंज ऑफरवर हे फोन मिळू शकतील. त्यासाठी जुन्या फोनवर १६ हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे. ३० एप्रिल पासून ते ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

Leave a Comment