या पाच देशांच्या पाच अनोख्या कहाण्या


जगात आजघडीला १९५ देश आहेत आणि प्रत्येकाची काही खासियत आहे. आज आम्ही आमच्या वाचकांसाठी अश्याच पाच देशांची ओळख करून देत आहोत. हा देशांची हि खास वैशिष्टे म्हणता येतील. कारण अन्य देशात ती दिसत नाहीत.

ब्रुनेई – आज जगातील महासत्ता म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेसारखे देश कर्जदार आहेत. आकडेवारी सांगते जगातील एकूण देशांचे कर्ज आता रेकॉर्ड बनले असून हा आकडा आहे १६४ लाख कोटी डॉलर्स. मात्र याच जगात एक छोटा देश असाही आहे कि ज्याच्यावर एक पैशाचेही कर्ज नाही. हा देश आहे ब्रुनेई. दक्षिण पूर्व आशियातील बोर्नियो बेटावर वसलेला हा देश १९८४ मध्ये युके पासून स्वतंत्र झाला. या देशाची अर्थव्यवस्था तेल आणि नैसर्गिक वायूवर चालते. येथील नागरिकांना खाण्यापिण्यापासून घरखरेदी पर्यंत सगळीकडे सबसिडी दिली जाते.


ग्रीस- सध्या हा देश कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. जगात बहुतेक सर्व देशांना त्यांचा त्यांचा राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीत आहे. ग्रीस याला अपवाद आहे. होम टू लिबर्टी हे राष्ट्रगीत येथे म्हटले जाते आणि जगातले ते सर्वाधिक लांबीचे राष्ट्रगीत आहे. मात्र ते ग्रीसचे नसून शेजारच्या रिपब्लिक ऑफ सायप्रस या देशाचे आहे. या दोन्ही देशांसाठी हे एकाच राष्ट्रगीत आहे.


कोस्टारिका – आज जगभरातील देश लष्करावरचा खर्च वाढवीत आहेत. प्रत्येक देश आपल्या तिन्ही म्हणजे लष्कर, हवाई दल आणि नौदल अधिकाधिक बळकट बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. कोस्टारिका देशाने लष्कर बाळगण्याची प्रथा तोडली असून या देशात सेना हा प्रकार नाही. लष्करावर होणारा खर्च वाचवून टो देशात शिक्षण, संस्कृती आणि आरोग्य सुविधासाठी वापरला जातो. १९४८ मध्ये प्रेसिडेंटनी देशाची घटना मान्य केली तेव्हाचा लष्कर बंद केले मात्र पोलीस फोर्स मजबूत केला आहे.


पोर्तुगाल- आज जगभरात अमली पदार्थ व्यापार आणि अमली पदार्थ सेवन यामुळे निर्माण झालेले प्रश्न जटील बनले आहेत. त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. मात्र युरोपिअन देश पोर्तुगाल मध्ये अमली पदार्थ सेवनाला कायदेशीर मान्यता आहे. त्यात हेरोईन कोकेन सारख्या पदार्थांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे अन्य युरोपीय देशांच्या अमली पदार्थ अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे मृत्युदर वाढला असताना पोर्तुगाल मध्ये तो अगदीच कमी आहे.


बेल्जीयम – कोणताही देश असला तरी तो चालाविण्यासाठी सरकार अथवा राजा हवाच. बेल्जीयमने हा समज खोटा पाडला आहे. हा देश तब्बल ५८९ दिवस विना सरकार चालत होता. जून २०१० मध्ये निवडणुका झाल्या मात्र २० पैकी कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. बेरीज वजाबाकीचे राजकारण अनेक दिवस करूनही देशाला सरकार मिळू शकले नाही. शेवटी ६ डिसेंबर २०११ ला सरकार अस्तित्वात आले. तोपर्यंत एस लेतार्मी यांनी देश सांभाळला. विशेष म्हणजे या काळात सर्व कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी वेळेवर कामावर आले, सर्व कामे सुरळीत पार पडली. या काळात रस्त्यावर निदर्शने, दंगे असा एकही प्रकार घडला नाही.

Leave a Comment