या छोट्या उपकरणांनी महिला करू शकतात स्वरक्षण


आजकाल रोजचा महिलांवर हल्ले, छेडछाड असे प्रकार झाल्याचे ऐकायला मिळते. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहतो. याला एक चांगला उपाय महिला अवलंबू शकतात आणि तो म्हणजे स्वतःच स्वताच्या रक्षणासाठी सिद्ध होणे. या कामी येऊ शकतील अश्या छोट्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. त्या फारश्या महाग नाहीत, सहज जवळ बाळगता येतात. आपल्याबरोबर गैरवर्तन करू पाहणार्यांना पुरेसा धडा शिकवू शकतात. कोणत्या आहेत या वस्तू?

स्टन गन – हे एक प्रकारचे शॉक देणारे उपकरण आहे. समोरच्यावर त्याचा वापर केला तर विजेचा झटका बसतो. यामुळे समोरचा थोडा घाबरतो आणि मुलीना सुटकेसाठी हवा तो महत्वाचा वेळ मिळू शकतो. कोणत्याची ऑनलाईन साईटवर ही गन मिळू शकते. ती फारशी महाग नाही.


नाईफ कार्ड- हा एक प्रकारचा चाकू आहे. त्याचा शेप क्रेडीट कार्ड सारखा आहे. तो पर्स मधून सहज नेता येतोच पण गरज भासल्यास त्याचा वापर चाकू प्रमाणे करता येतो.


डिफेन्स किचेन – आपण किल्ल्या एकत्र ठेवण्यासाठी वापरतो तशीच ही किचेन आहे. मात्र तिला अनेक टोके आहेत. हि वाघ्नाखासारखी बोटात घालता येते आणि गरज पडली तर तिची टोकदार टोके समोरच्यावर वार करण्यासाठी वापरता येतात. या टोकांमुळे समोरचा जखमी होऊ शकतो.


पेपर स्प्रे –हा एक प्रकारचा मिरचीचा स्प्रे आहे. हा स्प्रे उडवला तर समोरच्याला दूर पळून जाणे भाग पडतेच पण त्याच्या डोळ्यांना काही काळ अंधत्व येते. श्वास घेण्यास अडथळा येतो. या सर्व वस्तू संकट काळात महिलांसाठी वरदान ठरू शकतात आणि मुख्य म्हणजे यामुळे कुणाच्या जीवाला अपाय होत नाही.