ही नृसिंह मूर्ती उन्हाळ्यात असते थंड तर हिवाळ्यात गरम


देशभर आज विष्णूचा पाचवा अवतार नरसिंह याची जयंती साजरी होत आहे. देशात अनेक भागात नृसिहाची मंदिरे आहेत. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथेही जुन्या कसब्यात ११५० वर्षे जुने ऐतिहासिक नृसिंह मंदिर असून या मंदिराची स्थापना ८व्या ९ व्या शतकात भोसले राजे हर्हर्वांशी याच्या हस्ते झाली होती असे सांगतात.

या मंदिरात काळ्या पाषाणात कोरली गेलेली हि मूर्ती वैशिष्टपूर्ण आहे. तिचे विशेष म्हणजे हि मूर्ती उन्हाळ्यात स्पर्शाला गार लागते तर हिवाळ्यात गरम लागते. रायपुर आता स्मार्ट सिटी होणार असल्याने पुरातत्व विभागाने या मंदिराला जुना कसबा वारसा विशेष ओळख किली आहे. या मंदिराचे स्थापत्य अतिशय मनोहर आहे. २८ दगडी खांबांवर हे मंदिर तोलले आहे आणि खांब आणि छतावर सुंदर कोरीवकाम केले गेले आहे. ध्यानधारणा करणाऱ्या भाविकांना येथे सकारात्मक उर्जेचा खास अनुभव येतो असेही सांगतात.

याच मंदिरात भगवान विरंची नारायण प्रतिमाही आहे. समुद्रात आराम करणाऱ्या विष्णू नारायणाच्या नाभीतून निघालेल्या कमलावर ब्रह्मा विराजमान आहेत आणि पायाशी लक्ष्मी आहे. ११ फडी नागाने विष्णूवर छत्र धरले आहे. एकाचा पाषाणातून ही मूर्ती कोरली गेली आहे.

या मंदिरात नृसिंह जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. सकाळी बुढेश्वर मंदिरापासून मिरवणूक निघते. शोभायात्रा काढली जाते आणि सूर्यास्तानंतर हिराण्यकश्यपु वधाचे नाटक केले जाते.

Leave a Comment