‘स्मार्ट स्पीकर्स’ विकत घेतान घ्या ही खबरदारी


गाणी ऐकण्यासाठी, किंवा बोलण्यासाठी, ऑनलाईन खरेदी साठी आता स्मार्ट स्पीकर्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अॅमेझॉन तर्फे बाजारामध्ये आणल्या गेलेल्या ‘एको’ ह्या स्मार्ट स्पीकर्स नंतर आता गुगलने ही ‘गुगल होम’ ह्या नावाने स्मार्ट स्पीकर्स भारतीय बाजारामध्ये आणलेले आहेत. हे स्पीकर्स विकत घेताना तुम्ही काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. सर्वात मुख्य भाग हा, की आजवर बाजारामध्ये जितकी स्मार्ट गजेट्स उपलब्ध आहेत, ती सर्व इंग्रजी भाषेतून दिलेल्या कमांडवर चालतात. त्यातून इंग्रजी भाषेतून कमांड दिल्यानंतरही जर एकाद्या व्यक्तीचा ‘टोन’ ह्या स्पीकर्सला समजला नाही, तर ती कमांड फॉलो न होण्याची शक्यता असते. अश्या वेळी ह्या स्मार्ट स्पीकर्सला कमांड देण्यामध्ये अडचण येऊ शकते.

जर एखाद्या व्यक्तीच्या घरी वाय-फाय ची सुविधा नसेल, किंवा नेट कनेक्टीव्हिटी अतिशय कमी असेल, तर स्मार्ट स्पीकर्स काम करू शकणार नाहीत. ह्या स्पीकर्स साठी चोवीस तास वायफाय द्वारे उत्तम कनेक्टीव्हिटी आवश्यक असते. तसेच ह्या स्पीकर्सची आवश्यकता केवळ काही काळ गाणी ऐकण्यापुरतीच असेल, तर ह्या स्मार्ट स्पीकरची महाग किंमत मोजायची किंवा नाही, याचा देखील विचार करावा, त्याऐवजी सामान्य स्पीकर्सचा पर्यायही विचारात घ्यावा.

कोणतेही स्मार्ट गॅजेट चालविण्यासाठी तुम्हाला मोबाईल अॅपची गरज असते. ह्या अॅप शिवाय ही गॅजेट्स चालू शकत नाहीत. तसेच स्मार्ट स्पीकर्स वापरण्यासाठी देखील तुम्हाला मोबाईल अॅपची आवश्यकता असते. अश्या वेळी हे अॅप फोनवर स्टोर करण्याकरीता तुम्हाला तुमच्या फोनवरील स्पेस पुरी पडावी ह्या करिता इतर काही अॅप्स डीलिट करण्याची गरज पडू शकते, किंवा फोनवर अॅप्स खूप जास्त झाल्याने फोन ‘स्लो’ होऊ शकतो.

स्मार्ट स्पीकर्स कोणत्याही कंपनीचे असले, तरी त्यामध्ये गोपनीयता कितपत आहे, हा देखील महत्वाचा भाग आहे. कारण तुम्हाला स्मार्ट स्पीकर्सच्या मदतीने ऑनलाईन खरेदी करायची असेल, तर तुमच्या बँकेतील खात्याची सविस्तर माहिती, किंवा क्रेडीट कार्ड डीटेल्स तुम्हाला द्यावे लागतील. ही माहिती कितपत गोपनीय राहू शकेल हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे.

Leave a Comment