आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ह्या वस्तू पर्स मध्ये ठेवणे टाळा


आपल्या पर्समध्ये किंवा पैशांच्या पाकिटामध्ये असलेले पैसे कधीही संपू नयेत असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने बचत करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण काहींच्या बाबतीत, कितीही बचत करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांचे पैशांचे पाकीट वारंवार रिकामे होत असते. जास्त अवाजवी, अनावश्यक खर्च न करता देखील पैसे का संपत राहतात या प्रश्नांचे उत्तर कदाचित तुमच्या पर्समध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या इतर वस्तू ठेवता ह्यामध्ये असू शकेल. वास्तूशास्त्रानुसार काही वस्तू पर्समध्ये ठेवल्या असल्या, तर त्यामध्ये धन कधीही टिकून राहत नाही. त्यामुळे आपल्या पर्स मध्ये आपण इतर वस्तू ठेवताना काळजी घेणे आवश्यक आहे.

वास्तूशास्त्रानुसार तुमची पर्स कधीही फाटलेली किंवा उसविलेली असू नये. फाटलेली किंवा उसविलेली पर्स धनाचे नुकसान करणारी समजली जाते. त्यामुळे जर वापरत असलेली पर्स फाटलेली किंवा उसविलेली असेल, तर ती त्वरित बदलायला हवी. पर्सचा थेट संबंध धनाशी असल्यामुळे त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे पर्समध्ये ठेऊ नयेत. अनेक व्यक्तींना जुनी बिले, किंवा रिसीट पर्समध्ये ठेवण्याची सवय असते. त्यामुळे पाकिटामध्ये धन टिकून राहत नाही असे वास्तुशास्त्र सांगते. ह्या शास्त्रानुसार जुने कागद, रद्दी ह्यांवर राहूचा प्रभाव असतो, त्यामुळे अश्या वस्तू पाकिटामध्ये ठेवणे टाळावे.

पैशांच्या पाकिटामध्ये चॉकोलेट, टॉफी, पानमसाला अश्या प्रकारच्या वस्तू ठेवणे टाळावे. ह्या वस्तू पैशांच्या पाकिटामध्ये ठेवल्याने धनाची कमतरता भासू लागते. तसेच पैशांच्या पाकिटामध्ये औषधांच्या गोळ्या, किंवा तत्सम वस्तू ठेवल्याने नकारात्मक उर्जा वाढून आर्थिक नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे पैशांच्या पाकिटामध्ये लोखंडाची वस्तू ठेऊ नये. चांदी, तांबे ह्या धातूंनी बनलेल्या वस्तू, नाणी पैशाच्या पाकिटामध्ये ठेवणे शुभ मानले जाते.

Leave a Comment