बंद लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर द्वारेही मोबाईल फोन कसा चार्ज कराल?


जर मोबाईल फोन ची बॅटरी संपत आली असेल आणि मोबाईल फोन त्वरित चार्ज करण्याची आवश्यकता असेल, तर अश्यावेळी चार्जर किंवा बॅटरी बँकची गरज पडते. पण ह्या दोन्ही वस्तू जर उपलब्ध नसल्या तर मोबाईल फोन चार्ज करणे शक्य होत नाही. मात्र जिथे तुम्ही आहात तिथे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर उपलब्ध असेल, आणि तो बंद स्थितीत जरी असेल, तरीही त्याच्या मदतीने तुम्हाला तुमचा मोबाईल फोन चार्ज करता येऊ शकेल.

फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी आधी आपला लॅपटॉप सुरु करून ‘ my computer ‘ मध्ये जावे. त्यानंतर ‘file manager’ मध्ये जावे. आता डावीकडे वरील कोपऱ्यामध्ये दिसणाऱ्या ‘properties’ वर क्लिक करावे. मग ‘options’ वर क्लिक करून कंट्रोल समोर उघडलेल्या विंडोमध्ये ‘device manager’ वर क्लिक करा. ही विंडो उघडल्यावर ह्यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय नजरेस पडतील. ह्यामधील ‘universal serial bus controller’ ह्या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला दिसत असलेल्या पर्यायांमध्ये ‘USB root hub’ ह्या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर स्क्रीनवर आणखी एक विंडो उघडेल, ह्यामध्ये properties ह्या पर्यायावर क्लिक करून सर्वात शेवटी दिसत असणाऱ्या ‘power management’ ह्या पर्यायाची निवड करा. त्यानंतर ‘allow the computer to turnoff this device to save power’ ह्या पर्यायवर असलेली बरोबरची खूण ( tick mark ) तुम्हाला काढून टाकायची आहे, आणि ‘ok’ वर क्लिक करायचे आहे. आता तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद असताना देखील usb केबलच्यामादातीने तुम्ही अगदी सहज तुमचा मोबाईल फोन चार्ज करु शकता.

Leave a Comment