हर्ले डेव्हिडसन मोफत मिळविण्याची संधी


अनेकांचे त्यातही युवा पिढीचे एकदा तरी हर्ले डेव्हिडसनची मजबूत मोटारबाईक चालवावी असे स्वप्न असते. कंपनीने अशी संधी विद्यार्थी वर्गासाठी जाहीर केली असून यात हि बाईक १२ आठवडे स्वतःजवळ ठेवण्याची संधी मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हार्ले देव्हीद्सोन कंपनीने समर इंटर्नशिप प्रोग्राम सुरु केला असून त्यात हि बाईक फ्री वापरता येणार आहे. यासाठी ८ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून वयाची १८ वर्षे पूर्ण असणे हि त्यासाठी अट आहे. या विद्यार्थ्यांनी हार्ले डेव्हिडसन बाईक चालवायची आणि आपले अनुभव सोशल मिडीयावर शेअर करायचे आहेत. मिलवाकी मोटरसायकल उत्पादक कंपनी उमेदवारांना बाईक चालविण्याचे प्रशिक्षण देणार आहे तसेच प्रवासासाठी पैसे देणार आहे. या काळात बाईक उमेद्वाराकडेच राहणार आहे.

जे उमेदवार बाईक रायडींगच्या अनुभवावर चांगले लिहू शकतील, चांगले फोटो काढू शकतील आणि मजेदार व्हिडीओ शूट करतील अश्यातून अंतिम निवड केली जाणार आहे. सोशल मिडियामध्ये करियर करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Leave a Comment