रोमानियातही आहे एक बर्मुडा ट्रँगल


समुद्रात अनेक जहाजे, विमाने अकल्पितरित्या नाहीशी होत असलेल्या जागेबद्दल म्हणजे बर्मुडा ट्रँगल बद्दल आपण बरेचदा ऐकतो. जमिनीवरही अश्याच प्रकारचे एक जंगल असून ते रोमानिया येथे आहे. या जंगलाचे नाव होईया बासेउ असे असून येथेही ज्या अतर्क्य घटना घडतात त्यामागचे रहस्य अजून तरी उलगडलेले नाही. या घटनाबाबत कोणतेही स्पष्टीकरण करता येत नाही त्यामुळे या जंगलाला शापित मानले जाते. ट्रान्सील्व्हीया जिल्ह्यात हे रहस्यमयी जंगल असून येथेही पर्यटकांची गर्दी असते.


हे जंगल रोमानियाच्या प्राचीन आणि ऐतिहासिक क्लूज नापोकाच्या बाहेरच्या बाजूला आहे. येथे दूरदूरच्या देशातून साहसी पर्यटक येत असतात. या सुनसान जंगलात ते फिरतात आणि येथील असीम शांततेत जंगलचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करता. त्यांना फारसे काही भयावह दिसत नाही मात्र जंगलाबाहेर आल्यावर अंगावर भाजल्याच्या, खरचटल्याच्या खुणा दिसतात. तसेच जंगलात अचानक डोकेदुखी अथवा बचैनी जाणवते असाही अनुभव सांगितला जातो. दुसरे म्हणजे या जंगलात वेळेचे भान हरपते. म्हणजे येथे घालविलेला वेळ लक्षात नसतो. या काळात आपण कुठे होतो, किती वेळ होतो आणि काय करत होतो याची आठवण राहत नाही. त्याला लॉस्ट टाईम असे म्हटले जाते.

या जंगलातील झाडे गूढ आहेत. अनेकांनी या जागी एकदा उडती तबकडी पहिली आणि तेव्हापासून हे जंगल चर्चेत आले. येथे आजही विचित्र प्रकारचे आवाज येतात तसेच अनोखा आणि काहीसा गूढ प्रकाश या जंगलात भरून राहिलेला असतो. तो कुठून येतो याचा शोध लागत नाही असेही सांगितले जाते.

Leave a Comment