चीनमध्ये सुरु झाली पहिली मानवरहित बँक


चीनमधील चायना कन्स्त्ट्रक्शन बँक या सरकरी बँकेने देशातील पहिली मानवरहित बँक शाखा सुरु केली असून येथे ग्राहक राष्ट्रीय प्रवेशपत्र स्वाईप करून अथवा फेस रेक्ग्नीझेशन तंत्राचा वापर करून प्रवेश करू शकणार आहेत. येथे ग्राहकाशी संवाद साधु शकणारे रोबो, होलोग्राम सुविधा, फेशियल रेक्ग्नीझेशन टेक्निक अश्या सुविधा दिल्या गेल्या आहेत.

या बँकेत ग्राहकाने प्रवेश केला कि रोबो त्यांना नमस्कार करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील. येथे ग्राहक सोने खरेदी, चलन बदलून घेणे, बिले भाराने, कम्युनिस्ट पार्टी सदस्य शुल्क भरणे अश्या सुविधा वापरू शकतील तसेच व्हर्च्युअल रीअॅलीटीझम, होलोग्राम मशीनचा वापर करू शकतील. येथील मशीन्सच्या सुरक्षेसाठी गार्ड तैनात केले गेले आहेत तसेच व्हीआयपी आल्यास त्याच्या मदतीसाठी काही कर्मचारी नेमले गेले आहेत.

Leave a Comment