मानवी रक्ताचे विविध गट आहेत आणि त्यात आरएच पॉझिटीव्ह आणि निगेटिव्ह असे दोन फॅक्टर असतात हे आपण जाणतो. अर्थात पॉझिटीव्ह रक्तगटाच्या लोकांचे प्रमाण ८५ टक्के तर निगेटिव्ह रक्तगट त्यामानाने दुर्मिळ असतो. म्हणजे या रक्तगटाचे १५ ते १६ टक्के लोक जगात आहेत. या रक्तगटाविषयी एक धक्कादायक खुलासा नुकताच झाला आहे. या रक्तगटावर केलेल्या संशोधनानंतर या रक्तगटाच्या लोकांमध्ये परग्रहवासियांचा अंश असावा म्हणजे हे लोक परग्रहवासियांचे वंशज असावेत असे मानले गेले आहे.
निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्ती परग्रहवासियांचे वारस?
या दोन प्रकारच्या रक्तप्रकारातील लोकांच्या वर्तणूक, बुद्धिमत्ता, दुसऱ्याला जाणून घेण्याचे क्षमता भिन्न असते हे स्पष्ट झाले आहे. लाखो वर्षापूर्वी परग्रहवासीय पृथ्वीवर आले होते आणि येथील महिलांशी त्यांनी संबंध जोडले आणि त्यातून निगेटिव्ह रक्तगट प्रजा निर्माण झाली असा संशोधकांचा दावा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे एलियन आकाशगंगेतून पृथ्वीवर आले असावेत.सुमेरियन संस्कृती त्यातूनच निर्माण झाली. त्यातुनच अनुनाकी व्यक्ती जन्माला आल्या आणि सुमेरियन संस्कृतीचा पाया घातला गेला.