ह्या देशांमध्ये ‘साहित्य चोरी’ खुनापेक्षाही गंभीर गुन्हा


कॉपीराईटच्या बाबतीत किंवा इतरांनी लिहिलेले साहित्य स्वतःच्या नावावर खपविण्याच्या बाबतीत भारतामध्ये चर्चा सुरु झाल्या झाल्याच संपूनही जाते. वाण्ग्मय चोरी हा विषय आपल्याकडे सर्रास अनुभविला जात असतो. पण ह्या जगामध्ये काही देश असे आहेत, जिथे हा प्रकार खुनापेक्षा देखील गंभीर स्वरूपाचा समजला जातो. ह्या देशांमध्ये साहित्य चोरी च्या विरोधामध्ये कडक कायदेव्यवस्था आहे. असे कायदे अस्तित्वात आहेत, ह्याची माहिती फार कमी जणांना ठाऊक असेल. साहित्यचोरीच्या विरोधात कायदे सर्वप्रथम ब्रिटन ह्या देशाने अस्तित्वात आणले. ह्या देशामध्ये वाण्ग्मयचोरी बेकायदेशीर ठरविणारा ‘ लायसेन्सिंग ऑफ प्रेस अॅक्ट ‘ हा कायदा १६६२ साली अस्तित्वात आला.

वाण्ग्मयचोरी न होऊ देण्याची गरज ओळखून ब्रिटीश संसदेने हा कायदा बनविला. पुढे जागतिक पातळीवर ह्या कायद्याचे महत्व लक्षात आल्याने पुष्कळ देशांनी ह्या कायद्याचे अनुकरण करीत, साहित्यचोरी रोखण्यासाठी नवीन कायदे अंमलात आणले. हा काळ प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या विकासचा काळ होता. म्हणून कॉपीराईटची गरज सर्वात जास्त भासू लागली. अनेक देशांनी कॉपीराईट संबंधातील कडक कायदे अस्तित्वात आणले. हे कायदे आणखी बळकट बनविण्यासाठी अनेक देशांनी कॉपीराईट संबंधी परस्परांशी करारही केले.

कालांतराने भारतामध्येही कॉपीराईट विषयी कायदे बनविले गेले. १९१४ साली हा कायदा पहिल्यांदा अस्तित्वात आला. ह्यावेळी भारतावर ब्रिटीशांची सत्ता होती. ब्रिटन मध्ये १९११ साली बनविल्या गेलेल्या कॉपीराईट अॅक्ट मध्ये थोडेफार परिवर्तन करून हा कायदा भारतामध्ये लागू करण्यात आला. ह्या कायद्यानुसार कॉपीराईट ओनर, म्हणजेच त्या विशिष्ट साहित्याच्या मूळ रचनाकाराच्या परवानगीशिवाय जर त्याचे साहित्य कोणाही व्यक्तीने स्वतःचे नाव वापरून प्रसिध्द केले, तर हे कॉपीराईट संबंधी कायद्याचे उल्लंघन मानले जाते. अश्या प्रकारच्या साहित्य चोरीमध्ये मूळ रचनाकराचे किती नुकसान झाले आहे हे पाहून दंड ठरविला जातो. साहित्य चोरीचा आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपीला तीन वर्षे तुरुंगवास किंवा दंड ह्यापैकी शिक्षा दिली जाण्याचे प्रावधान ह्या कायद्याअंतर्गत करण्यात आले आहे.

पण ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये साहित्य चोरी विरोधातील कायदे अतिशय कडक असून त्यासाठी जबर शिक्षांचे प्रावधान केले गेले आहे. ब्रिटनमध्ये कॉपीराईट अॅक्टचे उल्लंघन केल्यास दहा लाख रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो. जर आरोप गंभीर स्वरूपाचा असेल, तर पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली जाऊ शकते. साहित्य चोरीच्या आरोपाखाली जर कुणी व्यक्ती दुसऱ्यांदा धरली गेली, तर ही शिक्षा आणखीनच कठोर होऊ शकते. दुसऱ्यांदा आरोप सिद्ध झाल्यास दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अमेरिकेमध्ये कॉपीराईट संबंधी कायद्यांचे उल्लंघन केल्यास अडीच लाख डॉलर्स पर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच ह्याबरोबर पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील दिली जाऊ शकते.

Leave a Comment