हे आयुर्वेदातील उपाय ठेवतील उन्हाळ्यातील आजारांना दूर


उन्हाळ्यामध्ये उद्भाविणारे लहान मोठे आजार दूर करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेले घरगुती उपाय अतिशय उत्तम मानले जातात. आधुनिक वैद्यक शास्त्राने देखील हे मान्य केले आहे. उन्हाळ्यातील उन्हाच्या कडाक्यामुळे आणि उष्णतेमुळे उद्भाविणारे लहान मोठे आजार, आयुर्वेद्क पद्धतींचा आपल्या आयुष्यामध्ये नियमित अवलंब करून दूर केले जाऊ शकतात. त्यामुळे हवामानामध्ये होणारे बदल लक्षात घेऊन त्यानुसार ह्या पद्धतींचा अवलंब केल्यास आरोग्य चांगले राहील. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त करून सन स्ट्रोक होणे, नाकातून रक्त येणे, उलट्या, पोट बिघडणे, सांधे दुखणे, त्वचेवर निरनिराळी इन्फेक्शन, भूक कमी होणे, अॅलर्जी, सर्दी पडसे, वात, अश्या तऱ्हेच्या समस्या भेडसावू लागतात. जर उन्हाळ्यामध्ये मध्ये आपले खानपान, पोशाख आणि आपली जीवनशैली हवामानाला अनुकूल असेल, तर हे आजार आपल्यापासून निश्चितच दूर राहतील.

उन्हाळ्यामध्ये सुती कपडे घालणे चांगले. त्यामुळे त्वचेवर हवा खेळती राहून शरीरावाटे बाहेर पडणारा घाम सुती कपडे अवशोषित करून घेऊन त्वचा कोरडी ठेवण्यास मदत करतात. जेव्हाही घरातून किंवा ऑफिसमधून उन्हामध्ये बाहेर पडायची वेळ येईल, तेव्हा डोके झाकण्यासाठी सुती कपड्याचा उपयोग करावा, अन्यथा टोपी किंवा छत्री बरोबर घ्यावी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पहाटे लवकर उठून केलेला व्यायाम, प्राणायाम शरीराला उपयोगी आहेत. तसेच जर ह्या काळामध्ये घामोळी, किंवा उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ येत असेल तर खोबरेल तेलामध्ये कापूर घालून लावल्याने आराम मिळतो. त्यांचप्रमाणे हरिद्रा खंड दररोज सकाळी एक चमचा रिकाम्यापोटी घेतल्यानेही फायदा होतो.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरून घरात आल्यानंतर त्वरित थंड पाणी पिऊ नये. ह्या दिवसांमध्ये माठामध्ये थंड केलेले पाणी सर्वात उत्तम. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला आर्द्रतेची आवश्यकता जास्त असते, त्यामुळे ह्या दिवसांमध्ये पाणी आणि फळांचे ताजे रस, टाक इत्यादी द्रव पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. तसेच ह्या दिवसांमध्ये तळकट, मसालेदार पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण असावे. अति तिखट पदार्थ, लोणची, बेसन किंवा मैदा वापरून बनविलेले पदार्थ, राजमा, छोले, इत्यादी पदार्थांचे सेवन अतिशय अल्प मात्रेमध्ये करावे. जवस, मूग, मसूर, टाक दही, सरबते, सत्तू, ताजी फळे, आंबे, कलिंगडे, शहाळ्याचे पाणी, कांदा, काकडी ह्या ऋतूमध्ये अधिक प्रमाणात खावेत.

जर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल, तर तुळशीचा पानाचा रस, किंवा सुंठपूड मधाबरोबर सेवन करावी. जर पोट बिघडून जुलाब होत असतील, तर बिन दुधाच्या चहामध्ये एक चमचा शुद्ध साजूक तूप घालून ह्या चहाचे सेवन करावे. उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे सेवन शरीराला फायदेशीर आहे. जर सन स्ट्रोक झाला असेल तर पुदिन्याची पाने वाटून, त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि जीऱ्याची पूड घालून ही पेस्ट पाण्यामध्ये मिसळून घेतल्यास उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवणामध्ये ताकाचा समावेश अवश्य करावा, त्यामुळे पित्त होत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment