नॉर्टनची कमांडो ९६१ कॅफे रेसर बाईक भारतात आली


कायनेटिक ग्रुप व्हेन्चर व नॉर्टनचे अधिकृत रिटेलर, मोटर रोयालने एमव्ही अगुस्ता मोटारसायकलच्या सहकार्याने भारतात ब्रिटीश मोटरसायकल ब्रांड नॉर्टनची कमांडो ९६१ कॅफे रेसर बाईक लाँच केली असून पुण्यात या बाईकची एक्स शोरुम किंमत २३ लाख रुपये आहे. सध्या एक बाईक आयात केली गेली आहे आणि मागणीनुसार हि संख्या वाढविली जाणार आहे. ११ लाख ५० हजार रुपये भरून या बाईकचे बुकिंग करता येणार आहे.

बुकिंग केल्यानंतर बाईकची डिलिव्हरी २ ते तीन महिन्यात दिली जाणार आहे. या बाईकचे डिझाईन क्लासिक ब्रिटीश रेसरवरून प्रेरणा घेऊन केले गेले असले तरी तिला आधुनिक टच दिला गेला आहे. छोटी फ्लाय स्क्रीन असलेली राउंड हेडलँप, क्लिप ऑन हँडलबार, स्पोर्टी कॅफे रेसर रायडींग पोश्चर, ९६१ सीसीचे पॅरलल ट्वीन इंजिन, हायक्लास इन्व्हरटेड फ्रंट फोर्क्स व रियल ट्वीन शॉक, दोन्ही चाकात डिस्क ब्रेक, हाय पर्फोर्मन्स टायर्स अशी त्याची फिचर आहेत.