थायलँडमधील या शहरात खुद्द पोलीसच शाळकरी मुलींना वेश्या व्यवसायात ढकलतात


उत्तर थायलँड येथे Mae Hong Son याठिकाणीचे पोलीसच तेथील कमी वयातील मुलींना वेश्यावृत्तीत ढकलण्याचे काम करतात. नुकताच येथील एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे असून त्यात हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. हे काम थायलँड येथे असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच केल्यामुळे हे प्रकरण समोर आले. हा खुलासा स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आला आहे. पैशांचे लहान मुलींना आमिष देऊन त्यांच्या गरीबीचा फायदा घेतला जातो. या शहरात जवळपास २८ लाख वेश्या असून तर त्यात ४० हजार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

बँकॉक पोस्टला एका मुलीने सांगितले की, जवळपास आठवड्यातून १० वेळेस तिला व्हीआयपी कस्टमर्सकडे पाठवण्यात येते. यातील बहुतांश लोक हे राजकारणी असतात. तिला एकदा तर तिच्या शाळेतील शिक्षकाबरोबर सेक्स करावा लागला होता. घरात असताना कधीही कॉल केला जातो आणि बोलावले जाते जर नाही गेले तर लोकांना घरी शोधण्यासाठी पाठवले जाते.

हा सेक्स रॅकेट चालणारा पोलीस अधिकारी Yutthachai Thongchai ला 320 वर्षाची शिक्षा देण्यात आली असून जास्तीत जास्त ५० वर्षाची शिक्षा थायलँडमध्ये होऊ शकते पण त्याच्यावर एवढे कलम लावण्यात आले आहेत त्यामुळे त्याला ३२० वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

या शहरात मसाजच्या नावाखाली वेश्यावृत्ती सर्रासपणे सुरु असते. १००० हून जास्त मसाज पार्लर या शहरात असून पूर्ण देशात काय होत असेल याचा अंदाजा त्यावरुन आपण घेऊ शकता. केवळ मसाज पार्लर नाही तर बारमध्येही एस्कॉर्ट उपलब्ध असतात.

Leave a Comment