अशी आहे मुकेश अंबानींची ‘जीवनरक्षक कार’


अनेकांना देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या मुकेश अंबानींच्या जीवनशैलीचे आकर्षण असून श्रीमंत व्यक्तीचे जीवन हे असुरक्षिततेने ग्रासलेले असते, असे म्हणतात. मुकेश अंबानीदेखील त्यामुळेच स्वत:च्या सुरक्षेबाबत जागरूक असतात. त्यासाठी एक खास कार त्यांच्याकडे आहे. बंदुकीतून सुटलेल्या गोळीचा अथवा लॅण्ड माइन्सचा काहीही परिणाम या गाडीवर होत नाही. त्यामुळे त्यांच्या या कारला जीवनरक्षक कार म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बीएमडब्ल्यू ७ सिरीजची आर्मर्ड ७६० Li ही ती कार असून, याच कारमधून मुकेश अंबानी प्रवास करतात. बघायला गेले तर या कारची एक्स शोरूम किंमत २.५ कोटींच्या आसपास आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीने मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कारमध्ये काही खास बदल करून घेतल्याने गाडीची किंमतदेखील वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या बीएमडब्ल्यू ७६० Li ची किंमत ८.५ कोटींच्या घरात आहे.

व्हीआर ७ बॅलिस्टिक सुरक्षा त्यांच्या कारमध्ये देण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने कारच्या दरवाज्यांमध्ये खास प्लेट्स बसविण्यात आल्या असून, कारच्या सर्व विंडोज बुलेट प्रुफ आहेत. बंदुक, ग्रेनेड आणि हाय इंटेंसिटीच्या १७ किलो वजनापर्यंतच्या TNT ब्लास्टवर कारची चाचणी घेण्यात आली आहे. तसेच या कारची लॅण्ड माइन्सवरदेखील चाचणी करण्यात आली आहे. सेल्फ सिलिंग फ्युएल टँक प्रकारातील या कारची इंधन टाकी असल्यामुळे यात आग लागू शकत नाही. केमिकल अॅटॅकचा कोणताही प्रभाव कारवर होऊ शकत नाही. जर का केमिकल अॅटॅक झाला तर कारमध्ये देण्यात आलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचा वापर केला जाऊ शकतो. मुकेश अंबानी अनेक सुरक्षारक्षक प्रणालींनी सज्ज असलेल्या कारमधून प्रवास करतात.

Leave a Comment