आंबा तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही खूप उपयुक्त


फळांचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे असा आंबा सगळ्यांनाच आवडतो. आंबा कधी पिकतो आणि मी तो खातो याची अनेकजण वाट पाहतात. पण हा आंबा फक्त तुमच्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर तो सौंदर्यासाठीही खूप उपयुक्त आहे. आज आम्ही आंब्याचे सौंदर्यविषयक उपयोग तुम्हाला सांगणार आहोत.

पिंपल्सला दूर ठेवण्यास आंबा खूप उपयुक्त आहे. जर तुमच्या चेहर्‍यावर फार जास्त प्रमाणात पिंपल्स झाले असतील तर कच्च्या कैरीला बारीक कापून त्याला पाण्यात उकळून घ्या. या पाण्याने दिवसातून दोनवेळा चेहरा धुतल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.

आंब्याचा गर एका वाटीत घ्या. एक चमचा मिल्क पावडर आणि एक चमचा मध यामध्ये मिसळून पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्याला लाऊन काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे डेड स्क‍िन आणि ब्लॅकहेड्स नाहीसे होऊन त्वचेला नॅचरल ग्लो येईल.

आंब्याच्या सालांनी तुम्ही फेसपॅक तयार करू शकता. याला उन्हात वाळवून त्याची पावडर तयार करून घ्या. या पावडरमध्ये दही किंवा गुलाब पाणी मिसळून रोज लावा. हा पॅक डार्क स्पॉट आणि पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. कैरी उकडून त्याचा गर चेहरा, गळा मान यावर चोळून घ्यावा व मग वाळल्यावर धुवावे. त्वचा मुलायम व कांतिमान बनेल.

Leave a Comment