फ्रीजमध्ये अंडी ठेवताना या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष


हिरव्या भाज्या, दुग्धजन्य लवकर खराब होतात. त्यामुळे आपण त्यांना फ्रीजमध्ये ठेवतो. पण असे काही पदार्थ आहेत की आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवावे की नाही हे कळत नसल्यामुळेच आपण जास्त विचार न करता तो पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतो. यात अंड्यांचाही समावेश आहे.

बहुतेकदा आपण अंडी फ्रीजमध्ये ठेवतो पण, त्याचे अनेक तोटे आहेत. हे आपल्याला माहित नाहीत. त्यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी अंडी फ्रीजमध्ये ठेवण्याचे दुष्परिणाम सांगणार आहोत.

अंड्यांचा वापर जर बेकिंग प्रॉडक्ट बनवण्यासाठी करणार असाल तर फ्रीजमध्ये अंडी ठेवू नका. जेव्हा तुम्ही अंडी विकत आणता आणि उकडायला ठेवता. तर ते फुटत नाही पण जर ते फ्रिजमधून काढून उकडायला ठेवले तर ते नक्कीच फुटते. फ्रीजमध्ये अंडी ठेवल्यामुळे संक्षेपण (कंडेनसेशन) होते. ज्यामुळे अंड्यांच्या छिलक्यावर असलेले बॅक्टेरीया वाढत जातात. असे अंडे खाणे आरोग्यासाठी धोकादायक असते. अंड्याचा वरील भाग अनेकवेळा खराब असतो. त्यामुळे दुसऱ्या पदार्थांनाही त्याचे संक्रमण आणि वास लागू शकतो. फ्रीजमध्ये ठेवलेले अंडी जास्त दिवस टिकतात, हे जरी खरे असले तरी थंडाव्यामुळे अंड्यातील पोषक तत्वे नष्ट होतात.

Leave a Comment