बाईक स्कूटरचे कॉम्बीनेशन असलेली होंडाची एलीसीन स्कूटर


दुचाकी वाहनात जगविख्यात असलेल्या होंडाने एक नवीच स्कूटर बाजारात आणली असून एलीसीन असे तिचे नामकरण केले गेले आहे. भारतात अजून हि स्कूटर आलेली नाही. मात्र हि स्कूटर म्हणजे बाईक आणि स्कूटर याचे अनोखे कॉम्बीनेशन आहे. या स्कूटरला कन्व्हर्टबाल रुफ आहे आणि ते पारदर्शक मटेरीअल पासून बनविले गेले आहे.

या स्कूटरचे कन्सेप्ट मॉडेल २००१ साली सादर केले गेले होते. स्कूटरला कन्व्हरबल रुफ असल्याने चालक आणि पिलियन रायडर दोघानाही पाऊस आणि ऊन यापासून संरक्षण मिळते. स्कूटरला चार सिलिंडर ७ स्ट्रोक इंजिन दिले गेले असून ते ७५० सीसीचे वॉटर कुल्ड इंजिन आहे. हे इंजिन टाटाच्या नॅनॉ, मारुतीच्या अल्टो पेक्षा पॉवरफुल आहे. स्कूटरला ऑटोमॅटिक गिअर बॉक्स, ट्वीन ब्रेक सिस्टीम, मोनो शॉक, मोनो आर्म सस्पेन्शन अशी फिचर आहेत.

Leave a Comment